
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाअंतर्गत भूमी अभिलेख विभाग सतत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नागरिकांना जमीन व्यवस्थापनाशी संबंधित सेवा अधिक पारदर्शक, अद्ययावत आणि सुलभ करण्याचा प्रयत्न करत आहे. या दिशेने आज मंत्रालयात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते “भूमित्र” या उपयुक्त चॅटबॉट सेवेचे लोकार्पण करण्यात आले.
“भूमित्र” म्हणजे काय?
“भूमित्र” हा एक AI आधारित चॅटबॉट आहे, जो नागरिकांना भूमी व्यवस्थापनाशी संबंधित सर्व माहिती महाभूमी (Mahabhumi) संकेतस्थळावरून देईल.या सेवेद्वारे नागरिकांना पुढील सुविधा मिळणार आहेत :
- सातबारा उतारा (7/12 Extract)
- जमिनीची मोजणी व फेरफार माहिती
- पीक पाहणी (Crop Inspection)
- मिळकत पत्रिका (Property Card)
- गावनकाशे व भूगोल नकाशे
- मालकी हक्काची नोंद Digital Land Records Maharashtra
अभिलेखांमध्ये झालेल्या बदलांची त्वरित माहिती SMS / Online Notification द्वारे
“भूमित्र” चॅटबॉट सेवेचे नागरिकांना फायदे
- वेगवान सेवा – कार्यालयीन फेऱ्या न मारता माहिती थेट ऑनलाइन मिळेल.
- पारदर्शक व्यवहार – भूमी अभिलेखांमध्ये फेरफार अथवा बदलाची माहिती तत्काळ कळेल.
- अद्ययावत माहिती – रिअल टाइम अपडेट्स मिळणार.
- सुलभता – मोबाईल, संगणकावरून कुठूनही सेवा वापरता येईल.
“भूमित्र” चॅटबॉट सेवेचा लोकार्पण सोहळा
ही सेवा आज मंत्रालय, मुंबई येथे सुरू करण्यात आली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितले की,
“या नव्या तंत्रसेवेच्या माध्यमातून नागरिकांना मोठ्या प्रमाणावर लाभ होईल आणि भूमी अभिलेख व्यवस्थापन अधिक पारदर्शक व उत्तरदायी होईल.”
महाराष्ट्रातील डिजिटल क्रांतीतील आणखी एक पाऊल
महाराष्ट्र शासनाकडून डिजिटल इंडिया संकल्पनेला अनुसरून महसूल विभागाने सातत्याने नाविन्यपूर्ण सेवा सुरू केल्या आहेत. “भूमित्र” चॅटबॉट Bhoomitra Chatbot Maharashtra ही त्याच साखळीतील नवी कडी आहे.
यामुळे आता ग्रामीण भागातील शेतकरी, जमीन धारक तसेच शहरी भागातील मालमत्ता धारकांनाही “एका क्लिकवर संपूर्ण भूमी माहिती” मिळणार आहे.
“भूमित्र” चॅटबॉट ही सेवा महाराष्ट्रातील भूमी अभिलेख पारदर्शकतेकडे टाकलेले महत्वाचे पाऊल आहे. नागरिकांना जमीन व्यवस्थापनातील माहिती मिळवण्यासाठी आता शासकीय कार्यालयीन धावपळ करण्याची गरज उरणार नाही. स्मार्टफोन आणि इंटरनेटद्वारे सहज उपलब्धता हे या सेवचे सर्वात मोठे वैशिष्ट्य ठरणार आहे.